शिवनेरीच्या सुपुत्राची भारतीय सेनेत गौरवशाली भरारी !

कर्नल विक्रम सुधीर बेनके यांची ब्रिगेडियर पदावर नियुक्ती; जुन्नर तालुक्यासह खानदेशा कसमादे विभागात आनंदाचे वातावरण

नाशिक | संदिप धात्रक – ९४२००००९४२
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या पवित्र किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जन्मलेल्या *कर्नल विक्रम सुधीर बेनके* यांनी भारतीय सेनेत आपल्या कर्तृत्वाची आणखी एक ऐतिहासिक छाप उमटवत ब्रिगेडियर पदावर नियुक्ती मिळवली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


देशसेवा, शिस्त आणि नेतृत्वाच्या बळावर *ब्रिगेडियर* पदापर्यंत पोहोचलेल्या विक्रम बेनके यांच्या यशामुळे तरुण पिढीला भारतीय सैन्यात करिअर करण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या नियुक्तीबद्दल शेतकरी संघटनेचे नेते तानाजी बेनके, माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांच्या पत्नी राजश्री बेनके, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अमित बेनके, डॉ. अमोल बेनके, गौरी बेनके, धनश्री बेनके, डॉ. पल्लवी बेनके, योगेश बेनके, सुधीर फुलवडे, विनायक तांबे, डॉ. फुलवडे आणि दयानंद डुंबरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ब्रिगेडियर विक्रम बेनके यांनी सांगितले की,
*“देशसेवा हे प्रत्येक तरुणाचे ध्येय असले पाहिजे. जुन्नर तालुक्यात शेतकरी मोठ्या संख्येने आहेत; मात्र जवानांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. जवान आणि किसान हे राष्ट्रनिर्मितीचे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत. दोघांनीही खांद्याला खांदा लावून काम केल्यास देशाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल.”*सैन्य नेतृत्वाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “सैनिकांच्या कामगिरीमागे त्यांचे समर्पण आणि मेहनत असते. नेतृत्वाची खरी जबाबदारी म्हणजे सैनिकांच्या यशाचे श्रेय त्यांना देणे.”
*ब्रिगेडियर बेनके यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, भाऊ पत्नी आणि संपूर्ण कुटुंबीयांना दिले.*
*विशेष खास अभिनंदन* म्हणजे, ब्रिगेडियर विक्रम बेनके हे खानदेशातील शेतकरी चळवळीचे झुंजार नेते स्वर्गीय नरेंद्र अहिरे यांचे जावई आहेत. त्यामुळे खानदेशातही त्यांच्या या यशाबद्दल अभिमानाची भावना व्यक्त होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शिवनेरीच्या मातीतून घडलेले हे नेतृत्व देशसेवेचे प्रेरणास्थान ठरत असून — “जवानांचा सन्मान आणि किसानांचा अभिमान” हा राष्ट्रनिर्मितीचा संदेश त्यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *