*मरावे परी किर्तीरुपी उरावे*
*आयुष्य जगतांना असे जगावे*
*कि, इहलोकी गेल्यावर आपणच*
*आदर्श उदाहरण ठरावे..*
असे लोकप्रिय, स्वाभिमानी, सामाजिक बांधिलकी जपणारे, स्पष्टवक्ता, सामान्य जनतेचे कैवारी, प्रतिष्ठित, नामी किर्तीवन्त व्यक्तिमत्व म्हणजे
*आदरणीय चंदन आबा*
*तृतीय पुण्यस्मरणानिमित्त*
*उद्या सामूहिक श्रध्दांजली चा कार्यक्रम आयोजित केला आहे.*
*दि. २|११|२०२४*
*वेळ. सकाळी ०९:३० वाजता*
*स्थळ: नेताजी केबल, कॉटेज हाॅस्पिटल जवळ, शिरपूर*
सुगंध चंदनाचा
कर्तृत्वाचा महामेरू, मनोभावे ज्यांना करती वंदन.
सुगंध दरवळतो अजूनही असे जनसेवेत झिजले चंदन.
बल भीम वज्र हनुमानाची प्रतिबिंबीत जणू छाया.
नवल वाटते कशी पोखरली एवढी बलशाली काया.
उजळत्या सुर्याची मध्यान्हात काळी रात्र झाली आज.
राजा गेला सिंहासन दुर्बल झाले संपले वैशाली राज.
शरिरा एवढेच सुदृढ निष्पाप परोपकारी होते मन.
पंखाविना पक्षी जणू, सर्वत्र पसरेल पोरके पण.
कर्तृत्वाचा ठसा असा कि सर्वत्र अबाधित आहे किर्ती.
देवा का दुभंगली माझ्याच घरची त्रिमूर्ती.
गोर गरिबांचा कैवारी त्यांची भक्ती ही साधी भोळी.
तूच तर रंग भरले देवा मग का अर्ध्यातच पुसली रांगोळी.
एवढ्या मोठ्या विभूतीला आम्ही कसे विसरू.
आमचे तर डोळ्यातच लपवतो पण कसे पुसू जनतेचे अश्रू.
एकटे असताना मात्र करितो आसवांची वाट मोकळी.
आयुष्यात निर्माण झाली कदापी न भरणारी पोकळी.
भावना मांडताना माहीत नाही कसा राहीला मनावर ताबा.
एकाकी आयुष्यात ना बाबा राहिले ना आबा.
. कवी – अंबादास सिसोदिया भवाळे