आरसेटीच्या स्वयंरोजगाराचे ध्वज नाशिकात फडकले !

आरसेटीच्या उपक्रमाने ग्रामीण तरुणाईत उत्साह

नाशिक :
भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत कार्यरत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) या केंद्रात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहपूर्ण ध्वजारोहण सोहळा पार पडला. बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर राजेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

RSETI म्हणजेच Rural Self Employment Training Institute ग्रामीण युवक-युवतींना विविध क्षेत्रात स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्याचे कार्य करत आहे. बँक ऑफ महाराष्ट्रद्वारे संचालित या संस्थेत कृषी, उत्पादन, प्रक्रिया व सर्वसाधारण उद्योग क्षेत्राशी संबंधित कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत दिले जाते. एवढेच नव्हे तर प्रशिक्षणार्थ्यांसाठी भोजन व निवासाची सोयही संस्थेमार्फत केली जाते.

समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम उद्योजक घडविणे हे आरसेटीचे ध्येय आहे. “तरुणाईने या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे. कौशल्ये अंगीकारून ग्रामीण भागात उद्योगधंदे उभारल्यास स्वतःसोबतच समाजालाही आधार मिळेल,” असे आवाहन झोनल मॅनेजर राजेश देशपांडे यांनी या वेळी केले.

ध्वजारोहण कार्यक्रमाला बँकेचे उपविभागीय व्यवस्थापक बी.बी. बेहेरा, एजीएम (सिपीसी कमर्शियल) उमाकांत केसगिरे, एलडीएम भिवा लव्हाटे, संस्थेचे संचालक गणेश सरोदे, प्रशिक्षक राजेंद्र पवार, चेतन भोये, समीर कुलकर्णी, रवि गावित, भूषण सरोदे यांच्यासह पदाधिकारी, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पवार यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षक दिशा सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रदर्शन समीर कुलकर्णी यांनी मानले.

स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्याच्या दिशेने झेप घेणाऱ्या अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील तरुणाईत आत्मविश्वास वाढून समाजाच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

राजु ठाकरे – ९९२१०२०१११

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण व सहायक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांचा सुवर्णपदकासाठी गौरव – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते

नाशिक, दि. २७ जुलै – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी नाशिक रोड येथील दुर्गादेवी मंदिर परिसरात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पार पडला. या स्मारकाचा जीर्णोद्धार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आला आहे.

या सोहळ्यास आमदार देवयानी फरांदे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री महाजन म्हणाले, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केवळ मंदिरांचे नव्हे, तर घाट, बारव व विहिरींच्या माध्यमातून जलसंवर्धनाचे कार्य केले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारे हे स्मारक प्रेरणादायक ठरेल.”

सहायक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांचा सुवर्णपदकासाठी गौरव

अमेरिकेत नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पोलिस आणि फायर स्पर्धा २०२५ मध्ये १० मीटर एअर पिस्टल शुटिंग प्रकारात सुवर्ण पदक पटकावणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांचा आज दुपारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

या सत्कार सोहळ्यास आमदार सीमा हिरे, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका अत्रे, डॉ. आरती हिरे, तसेच सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले, “महेश हिरे यांची कामगिरी अत्यंत प्रेरणादायक असून त्यांनी नव्या पिढीसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी भविष्यातही आपल्या शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर नव्या पिढीला मार्गदर्शन करावे.”

अतिथी संपादक – संदिप धात्रक – ९४२००००९४२

*कृषी दिनी शिवाजी राजपूत यांच्या वनश्री ऑक्सिजन पार्क मध्ये पाचव्या बांबू प्लांटेशनचा उत्साहात वाढदिवस साजरा*

*कृषी दिनी शिवाजी राजपूत यांच्या वनश्री ऑक्सिजन पार्क मध्ये पाचव्या बांबू प्लांटेशनचा उत्साहात वाढदिवस साजरा*

१ जुलै कृषी दिन शेतीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या कै. मा.मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे अवचित साधून पूर्ण महाराष्ट्रात विविध उपक्रम राबवली जातात. मात्र शिरपूर तालुक्यातील भोरखेडा गावातील ‘वनश्री ऑक्सिजन पार्क’ मध्ये एक आगळा -वेगळा पर्यावरण पूरक आणि प्रेरणादायी कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ते म्हणजे आदरणीय शिवाजी राजपूत यांच्या बांबू प्लांटेशनचा वाढदिवस होय. यावर्षी १ जुलै २०२५ रोजी या बांबू प्लांटेशनचा ५ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २०२० साली ५० एकर क्षेत्रावर विविध भागात १९ प्रजातींच्या बांबूची लागवड करून सुरु केलेला उपक्रम आज एक पर्यावरण चळवळ बनून उभा आहे. ह्या कार्यकामाची सुरुवात वाढदिवसाच्या केक आणि फीत कापून करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी बंधू, प्रशासन व कृषी विभातील अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. यानंतर वन भोजनाचे आयोजन करून परंपारिक पद्धतीने कृषी दिन साजरा करण्यात आला. शिवाजी राजपूत प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. शिवाजी राजपूत हे फक्त वृक्ष मित्र म्हणूनच नव्हे तर ते कृषी मित्र म्हणून ही ओळकले जातात.

त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून संकल्पनेतून निसर्ग संवर्धनाचे काम हाती घेतले आहे, ते अतुलनीय आहे. आज ही प्रत्येकाच्या वाढदिवस वृक्ष लावून साजरा करण्याची त्यांची परंपरा सुरु आहे. तालुक्यातील हजारो नागरिकांचे वाढदिवस ते वृक्ष लावून साजरे केले आहेत व करत असतात. हे वृक्ष लागवड केले ही नाही तर त्यांची जतन व संगोपन देखील व्यवस्थित रित्या केली आहे. आणि त्याची दखल राज्य किंवा अंतर राष्ट्रीय स्थरावर ही घेण्यात आली आहे. आज वर त्यांना विविध राज्यशासकीय, केंद्रशासकीय, खाजगी तसेच अंतर राष्ट्रीय पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले आहे. बांबू लागवड ही पर्यावरनाच्या दृष्टीने फायदेशीर आहे, तितकीच ती शेतकऱ्यांसाठी नविन उत्पन्नाचे स्रोत देखील ठरते असे शिवाजी राजपूत यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले.

बांबू म्हणजे हरीत क्रांतीचा नविन अध्याय, त्यातून मिळणारे फायदे हे केवळ पर्यावर्णापुरते मर्यादित नाहीत तर शेतकऱ्यांसाठी दीर्घकालीन आर्थिक श्वास्वतीचा मार्ग आहे. असे ते म्हणाले बांबू चा विविध प्रजातींमुळे जमिनीची गुणवत्ता सुधरते, पाण्याचे संचयन होते, जमिनीची धूप थांबते आणि त्याचे कागद, इंधन, बांधकाम साहित्य, हस्तकला साहित्य यासारख्या विविध क्षेत्रात उपयोग होतो. हे सर्व पर्यावरण आणि अर्थ व्यवस्थेत पूरक आहे.’वनश्री ऑक्सिजन पार्क ‘ केवळ बांबू लागवडी पुरता मर्यादित न राहता पर्यावरण शिक्षण केंद्र, शालेय शिक्षण सहलिंचे आकर्षण आणि शेतकऱ्यांसाठी बांबू प्रशिक्षण केंद्र म्हणून उदयास आलेल आहे. शिवाजी राजपूत यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. कि एकटा माणूसही आपल्या संकल्पनेतून जंगल फुलवू शकतो एक मानवनिर्मित जंगल उभे केल आहे

या कार्यक्रमासाठी यशस्वी आयोजनाचे स्थानिक, ग्रामस्थ, शेतकरी बांधव यांचे मोठे सहकार्य लाभले. या कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी, सामाजिक वनकरण विभागाचे राधिका फलफले, वन विभागाचे अधिकारी भूषण पाटील, शिरपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर परदेशी थाळनेर सहाय्यक पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील, तहसीलदार महेंद्र माळी, शिरपूर न.परिषदचे मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, गट विकास अधिकारी प्रदिप पवार, कृषी अधिकारी योगेश गिरासे, राजेश चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन नरेंद्रसिंग सिसोदिया, चार्टर्ड अकाउंटंट अंकित शेवाळे, उद्योजक प्रसाद पाटील, भोरखेडा गावाचे उपसरपंच प्रशांत राजपूत, सहाय्यक गट विकास अधिकारी गायकवाड, मंडळ अधिकारी वैशाली गिरासे, शितल गिरासे, पत्रकार महेंद्र राजपूत, प्रमोद राजपूत, युवराज भाऊसाहेब,महेश गिरासे, संग्रामसिंग पवार यासह मित्र परिवार आणि शेतकरी बांधव उपस्थित होते

चिमुकलीचा गळा घोटून पित्याची आत्महत्या : पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयाने शहर सुन्न

चिमुकलीचा गळा घोटून पित्याची आत्महत्या : पोलीस कर्मचाऱ्याच्या टोकाच्या निर्णयाने शहर सुन्न

दैनिक राष्ट्र उदय विशेष प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या स्वप्निल दीपक गायकवाड (वय 34) या अंमलदाराने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा घोटून खून केला आणि नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. ही दुहेरी घटना समजताच नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला.

स्वप्निल हे उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काल रात्री उशिरा त्यांच्या घरात ही घटना उघडकीस आली. भैरवी स्वप्निल गायकवाड (वय 6) ही बालिका पाळणा बांधण्याच्या लोखंडी हुकाला गळफास लावून मृतावस्थेत सापडली, तर बाजूलाच स्वप्निल गायकवाड यांचा ही मृतदेह आढळून आला.

कौटुंबिक विघटन, तणाव आणि आत्मविस्मृती

स्वप्निल यांचा काही महिन्यांपूर्वी पत्नीशी घटस्फोट झाला होता. कौटुंबिक कलह आणि मानसिक तणाव यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना इतरांचे जीवन वाचवण्याचं काम असतं, पण येथे स्वतः पोलीसच हतबल होऊन जग सोडून गेला.

स्वप्निल यांच्या पश्चात त्यांचे वृद्ध आई-वडील एकटे उरले आहेत. काही वर्षांपूर्वी एका भावाचा गंभीर आजाराने मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी रेल्वेखाली आत्महत्या केली होती. अशा काळात एकमेव आधार असलेला मुलगाही गेला आणि त्यांच्या जीवनात अंधार दाटून आला.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी भेट देऊन तपासाची माहिती घेतली आहे. पुढील तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

मन सुन्न करणारे प्रश्न

आजवर अनेकांनी आत्महत्येपासून माघार घ्यावी म्हणून सल्ले दिलेले असतात, समुपदेशन केलेले असते. पण ज्याच्या खांद्यावर इतरांना आधार देण्याची जबाबदारी होती, तोच जर तुटून पडला, तर मग समाजाने विचार करायला हवं नाही का?

एक चिमुकली – निष्पाप, निरागस आणि जीवनाच्या सुरुवातीला असलेली – तिला या जगातून का जावं लागलं? तिचा काय दोष होता? कोण म्हणतं फक्त महिला हतबल होतात – येथे एक पुरुषही तुटून कोसळला, आणि संपूर्ण समाजासाठी एक गंभीर संदेश ठेवून गेला.

तरुण पिढीला साकडे

आज आपल्या भोवतालच्या तणाव, कौटुंबिक संघर्ष, नात्यांतील दुरावा आणि मानसिक आरोग्य याबद्दल बोलणं गरजेचं झालं आहे. कोणताही निर्णय शेवट नसतो. आई-वडिलांचा, आपल्या लोकांचा विचार करा. तुम्ही हरलात, तर तुमचं संपूर्ण घर हरतं.

हा शोकांतिकेचा प्रसंग तरुण पिढीला जागं करेल का? की अजूनही आपण सोशल मीडियावर फिल्टर लावून जीवनाला झाकत बसू?
आत्महत्येचा विचार मनात आला, तर थांबा… विचार करा… आणि मदत घ्या.

> जीवन अमूल्य आहे. संकटं आली की मोडायचं नाही – झेलायचं आणि उभं राहायचं.

🙏 भैरवी आणि स्वप्निल यांच्या आत्म्यास शांती लाभो…
आई-वडिलांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची सायकल स्वारी – सायबर सजगतेचा जागर मंत्र ! सिन्नरपर्यंत सोबत वारी

नाशिक, १९ जूनगोल्फ क्लब मैदान, नाशिक येथून सुरू झालेल्या नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या पंढरपूर सायकल वारीत यंदा एक आगळा-वेगळा प्रसंग पाहायला मिळाला. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्वतः सायकलवर स्वार होत नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या वारीत सहभागी होत सिन्नरपर्यंतचा प्रवास सुरू केला.

या वारीचं वैशिष्ट्य म्हणजे – सायकलवर लावलेली सायबर सुरक्षेविषयी जागृती करणारी पोस्टर्स, ज्यामध्ये “OTP शेअर करू नका”, “बँक खात्याची माहिती गुप्त ठेवा”, “सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा” असे स्पष्ट संदेश देण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक सजग समाजाच्या वारीत सहभागी!

बाळासाहेब पाटील यांनी या उपक्रमात निव्वळ शुभेच्छा देणाऱ्या अधिकार्‍याची भूमिका न बजावता, स्वतः सायकल हाती घेत वारीमध्ये सहभागी होऊन एक सजग नेतृत्व दाखवले.
वारीतील प्रत्येक सायकल जनजागृतीचं एक वाहन ठरत असून, नागरिकांच्या नजरेतून या पोस्टर्समुळे सायबर सुरक्षेबाबतचा स्पष्ट जनसंवाद साधला जात आहे.

वारी ही सजगतेची वाटचाल” पोलीस अधीक्षकांचा संदेश

“आजच्या युगात फसवणुकीचे प्रकार इतके स्मार्ट झालेत की प्रत्येक नागरिकाने सायबर सजग राहणं गरजेचं आहे. वारीसारख्या धार्मिक व सामाजिक चळवळीचा वापर समाजप्रबोधनासाठी करणे आवश्यक आहे,”
– बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक

पोलीस विभाग लोकांमध्ये मिसळतोय उदाहरण ठरलेलं नेतृत्व

सिन्नरपर्यंत सायकल चालवत जाणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या सहभागामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
त्यांचा हा पुढाकार युवक, विद्यार्थी आणि नागरी संस्था यांच्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.

वारीतील सायकल पोस्टर्स जनसंवादाचे चालतेबोलते माध्यम

ही वारी म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धा नव्हे, तर चलती जनजागृती मोहीम आहे. प्रत्येक सायकलवरील पोस्टर नागरिकांपर्यंत पोहोचत असून, लोक संवाद न करता देखील जागरूकतेचा स्पष्ट संदेश ग्रहण करत आहेत.
हेच या उपक्रमाचं मोठं यश ठरत आहे.

सामाजिक जबाबदारीची सायकल वारी!

भक्ती, आरोग्य, पर्यावरण, सायबर सुरक्षा आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन यांचा अनोखा संगम असलेली ही वारी —
एक सजग समाज घडवण्याच्या दिशेने नाशिककडून पंढरपूरकडे निघालेली आदर्श यात्रा ठरेल.

 

हरीश बैजल सपत्नीक फुगडी खेळले – प्रेम, पोलीस आणि पारंपरिक उत्साहाचा संगम!

कार्यक्रमातील सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते निवृत्त पोलीस आयुक्त हरीश बैजल व त्यांच्या पत्नीने खेळलेल्या पारंपरिक फुगडीने!
बैजल दाम्पत्याने नागरिकांसह खुल्या दिलाने फुगडी खेळून एक आपुलकीचा, संवादमूल्याचा क्षण तयार केला.
त्यांचा सहज, आनंदी सहभाग पाहून नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि अनेकांनी तो क्षण मोबाईलमध्ये टिपून घेतला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

  • जिल्हाधिकारी जलज शर्मा
  • महापालिका आयुक्त मनीषा खत्री
  • निवृत्त पोलीस आयुक्त हरीश बैजल व सौ. बैजल
  • नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील
  • महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संजय बारकुंड
  • पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव
  • सायबर पोलिस स्टेशनचे सुभाष ढवळे
  • विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते

 

अतिथी संपादक – संदिप धात्रक, नाशिक – ९४२००००९४२

*आज पासून दैनिक राष्ट्र उदय नव्या रंगरूपात आपल्या समोर……*

*सस्नेह आग्रहाचे निमंत्रण* ✨

आदरनीय श्री/श्रीमती ___________________________,
*आज पासून दैनिक राष्ट्र उदय नव्या रंगरूपात आपल्या समोर……*

आपल्या अपार प्रेम, पाठिंबा, आणि विश्वासामुळे *दैनिक राष्ट्र-उदय* यंदा आपल्या 23 व्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करत आहे. 🎉 ही केवळ आमची नव्हे, तर आपल्या सर्वांचीच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. 🎊
*खंत एकच आहे ज्याने हे अभियान अविरत प्रचंड मेहनत आणि कष्टाने उभं केलं चालवलं ते दैनिक रोप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू असताना पाहण्यासाठी स्वर्गीय सतीश आपल्यात नाही परंतु स्वर्गीय सतीश वर प्रेम करणारे आपण आहात म्हणून आपली आजच्या दिवशी हजेरी महत्वाची वाटते यासाठी हा संपर्काचा प्रयत्न सोशल मीडियाद्वारे आपल्याशी करत आहे समक्ष येणे शक्य नसल्याने किंवा भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करणे देखील शक्य होत असल्याने हेच निमंत्रण समजून आपण आजच्या कार्यक्रमाला हजेरी लावा अस नम्र निवेदन*
या प्रवासातील प्रत्येक पावलावर आपण दिलेल्या पाठबळाने आम्हाला नवी ऊर्जा आणि दिशा दिली आहे. 💪
आता, या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर उभे असताना, आपल्यासमवेत या महत्त्वाच्या क्षणांचा आनंद साजरा करण्याची प्रबळ इच्छा आहे. 🥳


आपल्या उपस्थितीने आमच्या या विशेष सोहळ्याला आशीर्वाद मिळेल आणि तो आणखी स्मरणीय ठरेल. 🙏 आपल्या दिलेल्या सदिच्छाभेट आमच्यासाठी केवळ प्रेरणादायीच नव्हे, तर आमच्या निष्ठेचे प्रतीक असेल. 🌟 हा सोहळा अधिक मंगलमय आणि स्मरणीय होईल. 🙌 आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला सदैव प्रेरित करतील. 🌟
आमच्या या विशेष क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे, हीच आमची आग्रहाची विनंती आतुरतेने वाट पाहत आहोत. आहे. ❤️
📍 कार्यक्रम स्थळ:
*दैनिक राष्ट्र-उदय कार्यालय,*
१, पहिला मजला, शिवाजी मार्केट,
मेन रोड, शिरपूर, जि. धुळे,
पिन – ४२५४०५
🗓️ *दिनांक: 11/01/2025*
⏰ *वेळ: दुपारी ४:३०*

आपला स्नेहांकित,
*प्रफुल्ल विजयाबाई भगवानसिंग राजपूत उर्फ गजू*
मुख्य संपादक
*दैनिक राष्ट्र-उदय परिवार* ✍️

Brecking News